Monday, August 24, 2026
Homeउमरेडअन् 'तो' बसला होता कालव्याच्या पाइपलाइनमध्ये दडून..-बोंबाबोंब सुरू होताच; सोशल मीडिया झाला...

अन् ‘तो’ बसला होता कालव्याच्या पाइपलाइनमध्ये दडून..-बोंबाबोंब सुरू होताच; सोशल मीडिया झाला सक्रिय…-शेकडो नागरिक पोहचले ‘ऑन दि स्पॉट’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

उमरेड(नागपूर) :- मागील चार दिवसांपासून उमरेड तालुक्यातील उदासा-हेवती शिवारात असलेल्या कालव्यामध्ये वाघोबा ये-जा करीत असल्याची माहिती गावकऱ्यांना होती.अशातच पुन्हा काल,शनिवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास कालव्याच्या पाइपलाइनमध्ये वाघोबा दडून बसला असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली.

उमरेड येथून अंदाजे १० किमी अंतरावर हेवती रोडलगत राजेंद्र तिडके यांची शेती आहे.या शेतशिवारातील कालव्याच्या पाइपलाइनमध्ये वाघोबा दिसला.वाघ पाइपलाइनमध्ये असल्याची बोंबाबोंब सुरू होताच सोशल मीडिया सक्रिय झाला.हेवती, उदासा,मकरधोकडा,उमरेड,वेकोली येथून शेकडो नागरिक ‘ऑन दि स्पॉट’ पोहोचले.वनविभागाला माहिती मिळताच अधिकारी,कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळ गाठले.पोलिस ताफाही पोहोचला. परिसरातील नागरिकांची गर्दी उसळली होती.

हेवती-उदासा या गावालगतच मकरधोकडा कालवा आहे.या कालव्याच्या पाइपलाइनमध्ये वाघ मुक्काम करीत असल्याची बाब गावकऱ्यांना कळली.शिवाय मागील काही दिवसांपासून वासरू आणि अन्य जनावरांवर वाघाने हल्ला केला होता.शुक्रवारी गिरजा उरकुडे या महिलेच्या गायीवर वाघाने हल्ला करीत जखमी केले.शेतात जनावरे चराईसाठी नेले असताना ही घटना घडली.या संपूर्ण घटनाक्रमामुळे उदासा, हेवती परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. वाघ कालव्याच्या पाइपलाइनमध्ये असल्याने तो जखमी अवस्थेत आहे किंवा कसा? याबाबत वनविभाग चाचपणी करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!