Friday, October 16, 2026
Homeउमरेडकालव्याच्या पाइपलाइनमध्ये दडून बसलेल्या वाघावर ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर..

कालव्याच्या पाइपलाइनमध्ये दडून बसलेल्या वाघावर ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

उमरेड(नागपूर) :- मकरधोकडा कालव्याच्या पाइपलाइनमध्ये दडून बसलेल्या वाघावर सहा ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर आहे.उमरेड तालुक्यातील उदासा-हेवती शिवारात शनिवारी दुपारी ४ वाजेपासून कालव्याच्या पाइपलाइनमध्ये वाघ ठाण मांडून बसला. त्याला बघण्यासाठी तोबा गर्दी उसळली. वनविभागाने तातडीने चोवीस तास ६ ते ७ कर्मचाऱ्यांची चमू या ठिकाणी कर्तव्यावर ठेवली आहे.

पाइपलाइमध्ये असलेला वाघ हा दोन ते अडीच वर्षांचा नर असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. शिवाय, उमरेड-कन्हांडला-पवनी अभयारण्यातून भटकंती करीत हा वाघ या परिसरात आला असावा, असेही बोलले जात आहे. ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असले तरी अद्याप वाघ कॅमेऱ्यासमोर दिसून आलेला नाही. आमनदी वळणाचा हा परिसर असून, सभोवताल झाडाझुडपांचा वेढा आहे. यामुळे अडचण निर्माण होत आहे. साधारणतः दीड वर्षानंतर बछडे शिकार करायला शिकतात. यापूर्वी उदासा शिवारातील शेतात जनावरांना जखमी केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.वाघ जखमी आहे की नाही,कोणत्या अवस्थेत आहे, अद्याप ओळख व्हायची असून,वनविभागाची करडी नजर तसेच सहा ट्रॅप कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवून आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!