Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने फडकवला विजयाचा पताका..-डॉ.नामदेव किरसान,१ लाख ४० हजार २३४...

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने फडकवला विजयाचा पताका..-डॉ.नामदेव किरसान,१ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे.काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांनी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांचा दारुण पराभव केला आहे.विद्यमान खासदारांचा पराभव झाल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.विशेष म्हणजे १० वर्षानंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज केला आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते.महायुतीचे अशोक नेते,महाविकास आघाडीचे डॉ.नामदेव किरसान,बसपाचे योगेश गोन्नाडे,वंचित बहुजन आघाडीचे मडावी यांच्यासह एकूण ११ उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.सुरुवातीपासूनच अशोक नेते आणि डॉ.नामदेव किरसान यांच्यामध्येच अटीतटीची लढत होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.

मतमोजणीच्या पहिल्या राऊंड पासून ते सव्वीसव्या राऊंड पर्यंत डॉ.नामदेव किरसान यांनी विजयाची आघाडी घेतली.ही आघाडी अखेरपर्यंत कायम होती.मतमोजणीअंती काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांचा विजय निश्चित झाला.यामध्ये डॉ.नामदेव किरसान हे १ लाख ४० हजार २३४ मतांनी विजयी झाले.

कृषी महाविद्यालयाच्या मतमोजणी परिसरात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. जसजशी त्यांच्या उमेदवारांना आघाडी मिळत होती तसा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांचा विजय निश्चित असल्याचे दिसताच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.तब्बल १० वर्षानंतर या मतदारसंघावर काँग्रेसने झेंडा फडकवल्याने काँग्रेसमध्ये नव्याने उभारी मिळाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!