Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीअजब-गजब कारनामा...गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे 'बाबू' बनले विभागीय वन अधिकारी…..

अजब-गजब कारनामा…गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे ‘बाबू’ बनले विभागीय वन अधिकारी…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गेली चार महिन्यांपासून देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या पूर्वी झालेल्या व सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या भ्रष्टाचारा संदर्भात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांनी सर्वांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे.अशातच काहीजण नवनवीन फंडे वापरून टोलवा-टोलवी करून ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका अनेकजण बजावतांना दिसून येत आहेत.अशाच प्रकारची भूमिका गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे बाबु कामतवार यांनी दर्शविल्याचा प्रकार हल्ली उघडकीस आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी व कोरची तालुक्यातील वृक्ष लागवडीच्या साईटवर झालेल्या संपूर्ण भ्रष्टाचारा संदर्भात २ मे २०२३ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी आमरण उपोषण केला होता.त्यानुसार चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे लिखित पत्र देण्यात आले.मात्र अजून पावेतो कुठल्याही प्रकारची चौकशी वा कार्यवाही करण्यात आली नसल्याने परत पुन्हा तिसऱ्यांदा गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयासमोर रामटेके यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.आमरण उपोषणाचा इशारा देताच समिती गठीत करण्यात आली.त्यानुसार पत्रव्यवहार करण्यात येत आहे. पत्रव्यवहार तर करण्यात आला; मात्र दिलेल्या पत्रावरून स्पष्ट दिसून येते की,गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाचे ‘बाबू’ च  विभागीय वन अधिकारी झाले की काय? असे निदर्शनास येऊ लागले आहे.गडचिरोली सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात बाबु असलेले कामतवार हे विभागीय वन अधिकाऱ्यांच्या हुद्द्यावर नसतांनाही विभागीय वन अधिकारी म्हणून सही करून पत्रव्यवहार करणे कितपत योग्य आहे.यावरून असे स्पष्ट होते की,स्वतः च्याच मन मर्जीने पत्र तयार करून विभागीय वन अधिकारी हुद्द्यावर सही करून उपोषण कर्त्याच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे.

महत्वाचे म्हणजे,एखाद्या चौकशी सारख्या गंभीर पत्रावर स्वतः बाबू सही करून पत्रव्यवहार केले जाते. तर मग विभागीय वन अधिकारी करतात तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.एखाद्या गंभीर पत्रावर असे केले जात असेल तर इतर अन्य बाबींवर काय केले जात असावे? अशी शंका बळावली असल्याने अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!