Thursday, July 16, 2026
Homeब्रम्हपुरीआज ब्रम्हपुरी येथे 'गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके' नाटकाचे आयोजन..- विरोधी पक्षनेते विजय...

आज ब्रम्हपुरी येथे ‘गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकाचे आयोजन..- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘ब्रम्हपुरीचा राजा गणेशोत्सव’ मंडळा नजीक….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रम्हपुरी (चंद्रपूर) :- गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचे रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची,आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या “गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” नाटकाचा प्रयोग मौजा- ब्रम्हपुरी (जिल्हा -चंद्रपूर )येथे आज २१ सप्टेंबर २०२३ ला रात्री ८.३० वा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या “ब्रम्हपुरीचा राजा गणेशोत्सव मंडळ” मध्ये संत तुकडोजी महाराज पटांगणात भव्य दिव्य स्वरुपात आयोजित करण्यात येणार आहे .

झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी या नाटकाचे लेखन केलेले असून,प्रसिद्ध गायक, दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी त्यांच्या लोकजागृती संस्था,चंद्रपूरच्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे.सिनेस्टार मुन्ना बिके,निखिल मानकर,राजरत्न पेटकर,  संजीव रामटेके,सुरज चौधरी,गुरू मोहूर्ले,अविनाश कडूकर,अमित दुर्गे,यश शेंडे,वेदांत मेहता,अंकुश शेडमाके,भाष्कर मडावी,शुभम गुरनुले,गणेश मडावी, मयुर मस्के,अनुराग मुळे,स्नेहल वाडगुरे इ.पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम,रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे,प्रियंका सिडाम,माधुरी ढोरे,मनिषा बावणे,प्रविण लाडवे,संजना येलेकर,राजश्री,स्मिता, भावना इत्यादी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नवी दिल्ली यांचे “नाट्य प्रशिक्षण शाळेत” प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत.रेला नृत्य,आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत नाटकाचे खास आकर्षण असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!