Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीअखेर महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण करणाऱ्या समाजकंटकाची कारागृहात रवानगी.. - बौध्द अस्मिता रक्षण...

अखेर महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण करणाऱ्या समाजकंटकाची कारागृहात रवानगी.. – बौध्द अस्मिता रक्षण समितीच्या पाठपुराव्यास यश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आजही काही बिनडोक बुद्धीचे परजीवी लोकं उसनी अक्कल वापरून समाजात द्वेष पसरविण्याचे काम करीत असतात.अश्यांना कितीही ग्यान वाटले तरीही ‘ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे’ असे करून सर्वकाही गमावून बसतात.करणी करायसाठी टोचन देणारे भरपूर मिळतात,पण अंगावर शेकली की स्वतःचे स्वतःलाच सांभाळावे लागते.हे सर्व माहीत असूनही अनेकजण पुढचे पुढील बघून घेऊ,असे म्हणून बुचकळ्यात पडतात.असाच काहीसा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात नुकताच उघडकीस आला आहे.एका समाजकंटकाने
महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण केल्या प्रकरणी त्याला जेलची हवा खावी लागली आहे. अभिजित मोरेश्वर मोहूर्ले वय ३७ वर्षे रा. सोमनपल्ली ता.चामोर्शी,जि.गडचिरोली असे जेलची हवा खाणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
माहितीनुसार,अभिजित मोहूर्ले याने मागील महिन्याच्या २६ मार्चला महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण केले होते.त्यामुळे सदरचे लिखाण करणाऱ्या विरोधात आंबोली,किष्टापुर व परिसरातील बौद्ध बांधवांनी आवाज उठवून आंदोलन छेडले होते.त्यातच महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण करणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी बौध्द अस्मिता रक्षण समिती येणापूर सर्कलने पाठपुरावा केला होता.त्यानुसार अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांनी आरोपीचा शोध लावण्याकरिता तपास यंत्रणा कामी लावली होती. तपास यंत्रणेने अधिक चौकशी अंती महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण करणाऱ्या अभिजित मोहुर्ले या समाज कंटकास जेरबंद करून आरोपी विरुध्द २९९ बीएनएसआर/डब्ल्यू ३ (१) (व्ही)३१ (यु) अनुसूचित जाती अधिनियम कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आरोपीस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.
महापुरुषांबद्दल अपमानजनक लिखाण करणाऱ्या समाजकंटकाची कारागृहात रवानगी करण्यात आल्याने बौद्ध अस्मिता रक्षण समितीने उपविभागीय पोलिस अधिकारी कोकाटे व आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांचे आभार मानले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!