Monday, May 25, 2026
Homeमुंबईअखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष म्हणजे,तुकाराम मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत; पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले.मुंढे यांची गेल्या एप्रिल महिन्यात दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन,पुनर्वसन व मदत कार्य  विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.मात्र,सदरच्या बदलीला लगेच स्थगिती देण्यात आली होती.तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते.त्यानंतर,मंगळवार १९ मे २०२६ रोजी त्यांची नियुक्ती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली.गेल्या २१ वर्षात त्यांची ही २५ वी बदली आहे.महत्वाचे म्हणजे,काही काळापासून अन्न व औषध प्रशासन विभाग भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे.लाचखोरीपासून मंत्र्यांच्या कथित चित्रफितीपर्यंत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे वादात सापडले होते.अश्यातच आता तुकाराम मुंढे यांची वर्णी लागली आहे.दिव्यांग कल्याण विभागात असतांना बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर शिकंजा कसला होता.कारवाईचा बडगा सुरू असतांनाच त्यांची बदली करण्यात आली होती.तुकाराम मुंढे कडक प्रशासकीय शैलीमुळे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या कणखर भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि विविध सरकारी विभागांमध्ये काम करतांना त्यांनी जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले.त्यामुळे त्यांना नवी ओळख मिळाली.नियमांचे काटेकोर पालन,प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि बेकायदेशीर कामांना पायबंद घालणे ही त्यांच्या कामाची जमेची बाजू ठरली.कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता,सामान्यांच्या हक्कासाठी धाडसी निर्णय घेणारा अधिकारी म्हणूनही त्यांना ओळखले जाते.त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागात सफाई करण्यासाठी मुंडे यांना पाठविण्यात आल्याचे म्हटले जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!