Thursday, October 1, 2026
Homeनागपूरअखेर धावत्या ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या आरोपीस अटक..

अखेर धावत्या ट्रेनवर दगडफेक करणाऱ्या आरोपीस अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवार २५ सप्टेंबरच्या रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास बोरखेडी परिसरात घडली होती.दगडफेकीत ट्रेनच्या तीन एसी कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या.दरम्यान,एका डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि काचेचे तुकडे थेट प्रवाशांच्या चेहऱ्यावर उडाले.यातील काही तुकडे प्रवाशांच्या जेवणातही पडले होते.घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी पथकाने बोरखेडी-सिंधी दरम्यान शोधमोहीम राबवली.मात्र, संशयित व्यक्ती वा ठोस पुरावा हाती लागलेला नव्हता.अश्यातच दुरंतोवर दगडफेक झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने चौकशी सुरू करून अज्ञात आरोपीविरुद्ध रेल्वे ॲक्ट १५३,१४७ नुसार गुन्हा दाखल केला.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज कुमार यांनी या घटनेच्या तपासासाठी अजनी रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक आर.जी.निपसैया, विशेष तपास शाखेचे निरीक्षक अरुण ठवरे,उपनिरीक्षक आर.के.राम,अश्विन पवार,सहाय्यक उपनिरीक्षक अभय बेदरकर,अतुल सावंत,वसिम खान,हरविंदर सिंह,श्याम झाडोक यांचे पथक गठित केले.पथकाने बोरखेडी रेल्वेस्थानक,ब्राह्मणी गाव व बुटीबोरी परिसरात तपास सुरू केला.रेल्वे सुरक्षा दलाने दगडफेकीच्या घटनेची चौकशी केल्यानंतर बोरखेडी नगरपंचायतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या वेळी आरोपी रेल्वे रुळाकडे जाताना दिसला.तसेच दोन व्यक्तींनी तो घटनेच्या वेळी रेल्वे रुळाकडे जातांना पाहिल्याचे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाला आरोपीविरुद्ध सबळ पुरावे मिळाले. पोलिस बोरखेडीत दगडफेकीची चौकशी करीत असल्यामुळे आरोपीने तेथून पलायन करून नागपूर शहरात बांधकाम मिस्त्रीकडे काम सुरू केले.आरोपी नागपुरात ऑटोमोटिव्ह चौकात असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने त्यास बेड्या ठोकल्या.नरेंद्र कुमार हिसाबीलाल सिरसाम वय ३५ वर्षे,रा.रामगडी, ता.नैनपूर,बमहनी,जि.मंडला,मध्यप्रदेश असे दगडफेक करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो बांधकाम मिस्त्री म्हणून काम करतो.कामानिमित्त तो पत्नीसह बोरखेडी परिसरात होता.घटनेच्या रात्री त्याचे पत्नीसोबत जोराचे भांडण झाल्याने त्याने रागाच्या भरात तीन वेळा दारू ढोसली.त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत रात्री साडे आठ वाजता बोरखेडी रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या परिसरात गेला.दरम्यान,आरोपीने मोठमोठे दगड हातात घेतले आणि दुरंतो एक्स्प्रेसवर भिरकावले.यात दुरांतो एक्स्प्रेसच्या तीन कोचच्या काचा फुटल्या.आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

महिन्याची सुरुवात गॅस सिलेंडरच्या दरवाढीने..!

उद्रेक न्युज वृत्त :-सरकारी तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यवसायिक ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.आज,गुरुवार १ ऑक्टोंबरच्या सकाळीच सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या...

दुर्गम भागातील विकासकामे विहित मुदतीत पूर्ण करा-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षल प्रभावित असलेल्या दुर्गम व अतिसंवेदनशील भागांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे.रस्ते,पूल,मोबाईल कनेक्टिव्हिटी,आरोग्य व शिक्षण...

सरकारी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर न्यायालयाने कडक शब्दांत ओढले ताशेरे..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'सरकारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत, मालक नाहीत,' अधिकारी वेळेत काम करत नसल्याने नागरिकांना न्यायालयात धाव घ्यावी लागते आणि अशा याचिकांमुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!