Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चुडाराम बल्हारपुरे सन्मानित..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चुडाराम बल्हारपुरे सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ९९ वे कवी संमेलन नुकतेच सातारा येथे पार पडले.कवी संमेलनाच्या प्रथम सत्रात झाडीपट्टीतील नाटककार,साहित्यिक तथा कवी चुडाराम बल्हारपुरे यांना निमंत्रित कवी म्हणून पाचारण करण्यात आले होते. संमेलनातील मुख्य मंडपात उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध साहित्यिक व कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात चुडाराम बल्हारपुरे यांनी ‘रानगर्भातील रानफुले’ या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कवितेचे सादरीकरण केले.प्रसंगी उपस्थित कवी, साहित्यिक व रसिक प्रेक्षकांनी त्यांच्या कवितेला उत्स्फूर्त दाद दिली.कवी संमेलनाचे संचालन प्रसिद्ध कवी प्रा.प्रदिप कांबळे यांनी केले.या कवी संमेलनात विदर्भातील दोन कवींसह संपूर्ण देशातून ३३ प्रसिद्ध कवी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी यांचे हस्ते तसेच गुरय्या स्वामी (उपाध्यक्ष),विनोद कुलकर्णी (कोषाध्यक्ष),सुनिता राजे पवार(कार्यवाह),नंदकुमार सावंत(अध्यक्ष म.सा.प. पुणे), अनिल जठार(सदस्य मावळा फाऊंडेशन) व कवी संमेलनाचे अध्यक्ष अशोक नायगावकर इ.मान्यवर यांचे उपस्थितीत चुडाराम बल्हारपुरे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर, प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा.डॉ.योगीराज नगराळे,प्रा. राजेंद्र गोहणे,नाट्यश्रीचे दादा चुधरी,दिलीप मेश्राम, राजेंद्र जरुरकर,डॉ.दिपक चौधरी,रमेश निखारे,तसेच प्रा.नवनीत देशमुख,राजीव पुजारी,नरेंद्र कदम,मुग्धा बोरकर,सुनील बावणे,प्रदिप देशमुख यांचेसह साहित्यिक तसेच मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर(प्रकाशक)व इतर साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!