Sunday, July 19, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंजच्या क्षितीज उरकुडेची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत बाजी..

देसाईगंजच्या क्षितीज उरकुडेची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत बाजी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे प्रादेशिक विद्या प्राधिकरण,नागपूर व शिक्षण विभाग(माध्यमिक)जिल्हा परिषद,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकिय निवासी शाळा वांगेपल्ली येथे पार पडलेल्या ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत देसाईगंज महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी क्षितीज लवकुश उरकुडे याने सहभागी होऊन माध्यमिक सर्वसाधारण गटातून ‘कृत्रिम बुध्दीमत्ता गॅस लिकेज सिस्टम'(AI Gas Leakage System)बाबत वैज्ञानिक प्रतिकृती सादर केली.या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाले असुन क्षितीजचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते  प्रशस्तीपत्र व पदक चिन्ह प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
समारोपीय व बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे होते.विज्ञान प्रदर्शनातील वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे माणसाच्या जीवनातील सामाजिक,व्यवसायिक व आर्थिक प्रगती शक्य तितक्या वेगाने गाठता येते, असल्याचे प्रतिपादन अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. यावेळी उपस्थित माजी आमदार दीपक आत्राम यांनीही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विज्ञान असल्याचे सांगितले.समारोपीय कार्यक्रमाच्या वेळी मंचावर प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार,अहेरीचे बिडिओ गणेश चव्हाण,उपशिक्षणाधिकारीअमरसिंग गेडाम,योजना विभागाचे शिक्षणाधिकारी बच्चाव, गडचिरोली,एटापल्ली, मुलचेरा,सिरोंचा,आरमोरी येथील गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका प्रियंका डांगेवार, गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी केले.
क्षितीज याने यशाचे श्रेय आई-वडील,प्राचार्य महेश मुंडले,मार्गदर्शक शिक्षक उत्तम निमजे व सहकारी  विद्यार्थी यांना दिले.या यशाबद्दल क्षितीजचे सर्व
स्तरावरून कौतुक करण्यात येत असुन देसाईगंज महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महेश मुंडले,ज्ञान विकास शिक्षण प्रसारक मंडळ देसाईगंजचे अध्यक्ष ॲड.जयंत हटवार,सचिव अंजली हटवार तसेच संस्थेचे सर्व संस्था पदाधिकारी,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांनी पकडले सुगंधीत तंबाखूचे मोठे १० पोते..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-सध्याच्या घडीला राज्याच्या विविध भागात अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा व इतर मादक पदार्थ विक्री तथा त्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू असतांनाच...

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ; प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान,कोलकाता यांच्या समान निधी(Matching Schemes)व असमान निधी(Non-Matching Schemes)योजनांद्वारे राज्यातील शासनमान्य...

रेल्वेची धडक; सहा हरणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या पारशीवनी तालुक्यातील कन्हान नगर परिषद हद्दीच्या तुकाराम नगर नजीकच्या रेल्वे स्टेशन परिसरातील ट्रॅकवर तब्बल सहा हरीण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज,शनिवार...

नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद शाळेत दोन डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन; प्रत्यक्ष मतदानातून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नैनपूर वार्ड येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शिक्षण आणि लोकशाही मूल्यांचा सुंदर संगम अनुभवत आज,शनिवार १८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!