Saturday, April 25, 2026
Homeमुंबईआजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; स्टॅम्प पेपर महागला

आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; स्टॅम्प पेपर महागला

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ३० सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मुद्रांक शुल्क सुधारणांना मंजुरी देण्यात आली होती.त्यानुसार राज्य सरकारने मुद्रांक शुल्कवाढीचा निर्णय घेतल्यामुळे आजपासून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करून महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टॅम्प जारी केले जातील.त्यामुळे,आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री लागणार आहे.
सर्वसाधारणपणे जिथे १०० रुपये लागत होते तिथे आता ५०० रुपये द्यावे लागणार आहेत.महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाला चालू वर्षात सुमारे ६० हजार कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.गेल्या वर्षी या विभागाने राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली होती.मुद्रांक शुल्क हा राज्य सरकारच्या महसुलाचा मोठा स्त्रोत जरी असला,तरी लाडक्या बहिणींना दीड हजार दिले.परंतु त्याच बहिणीच्या खऱ्या भावाकडून काही हजार काढून घेतले जाणार आहे.आतापर्यंत नोटरीचा साधा स्टॅम्प १०० रुपयांना मिळत होता.आता तो ५०० रुपयांना मिळणार आहे.बहिणीला दिलेली रक्कम भावाकडून वसूल करून घेत असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत.
 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसह तब्बल ४७ नक्षलवाद्यांचे शत्रांसह आत्मसमर्पण..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील संपूर्ण नक्षलवाद ३१ मार्च २०२६ पर्यंत संपुष्टात आणू,असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले होते.त्यानुसार पावले उचलण्यात आली.जे जंगल...

आंधळीत जागतिक हिवताप दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून आज,शनिवार २५ एप्रिल रोजी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी व...

उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे द्या तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल पूर्ण करा- आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघड्यावर साठवलेले धान प्राधान्याने मिलर्सकडे देण्याचे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व धानाची उचल पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी...

सावधान..! देसाईगंज तालुक्यात ठगबाजांची टोळी सक्रीय.. घरकुलच्या नावाने जाळ्यात अडकवून पैसे लुटीचा प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महागाईचे संकट असो वा स्वस्ताईतील पुरण पोळी,प्रत्येकांनाच वाटतेय की आपले छोटेसे घर असावे.मग,शासनाच्या अनुदानातून असो की स्वतःच्या खिशातील पैस्यातून बांधकाम केलेले असो....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!