- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-म्हशी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाचा मालवाहू जीपला पाठीमागे लटकून जात असतांना देसाईगंज-आमगाव बायपास मार्गावर डोक्याला लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना काल,रविवार दिनांक-१३ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.रवी गोविंदा राऊत वय ३७ वर्षे,रा.गवराळा, ता.लाखांदूर, जि.भंडारा असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
रवी राऊत याचा म्हशी खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. त्यासाठी तो ब्रम्हपुरीला बाजारात गेला होता.राऊत हा ब्रम्हपुरी वरून म्हशी विक्री करून मालवाहू जीपला पाठीमागे लटकून लाखांदूरकडे जात होता.जात असतांना देसाईगंज-आमगाव बायपास मार्गावर त्याच्या डोक्याला लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श झाला. विद्युत तारेचा स्पर्श होताच मान व चेहरा पूर्णपणे भाजल्या गेला व मुंडके पाठीमागे झाले.रत्यावर रक्ताचा सडा पडला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.लगेच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली.घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास देण्यात आली.पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन त्याला देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी रवी राऊत यास मृत घोषित केले.
- Advertisement -

