Tuesday, September 22, 2026
Homeकोंढाळाभजनाच्या तालावर थिरकल्या माजी महिला व बालकल्याण सभापती.. - माऊली शारदा उत्सव...

भजनाच्या तालावर थिरकल्या माजी महिला व बालकल्याण सभापती.. – माऊली शारदा उत्सव मंडळच्या वतीने पारंपरिक लोककला जिवंत ठेवीत शारदा विसर्जन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(गडचिरोली):-सध्याच्या घडीला कुठलेही कार्यक्रम वा सार्वजनिक उत्सव मंडळांचे विसर्जन असोत अनेकजण डीजेच्या तालावर नाचत-गाजत मोठ्या प्रमाणावर धिंगाणा घालीत असतात.हल्ली पारंपरिक लोककला ही नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.अशातच देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील माऊली शारदा उत्सव मंडळच्या वतीने पारंपरिक लोककला जिवंत ठेवीत आज,शनिवार दिनांक-१२ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास शारदा मातेचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
माऊली शारदा उत्सव मंडळ कोंढाळाच्या वतीने प्रथम वर्षीय शारदा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यात पारंपरिक लोककला जिवंत ठेवित गोपालकाल्याच्या दिवशी भारूळ कार्यक्रमाचे आयोजन करून समाजप्रबोधन करण्यात आले.
सध्या स्थितीत डीजे कॉमन झाले असले,तरी या मंडळाने डीजे न वाजवता विसर्जन निमित्ताने शोभायात्रा काढून भजन म्हणीत ढोलकी,भणभने,नाल-मृदंगात मिरवणूक काढली.यात महिला,पुरुष, लहान मुले,अबालवृद्ध यांनीही भजन म्हणीत विसर्जनात सहभाग नोंदवून घेतला होता.विशेष म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती रोशनीताई पारधी यांनी गळ्यात ढोलकी घालून भजनाच्या तालावर ढोलकी वाजवीत थिरकल्या व महिलांचा आनंद द्विगुणित केला.माऊली मंडळाने पारंपरिक पद्धतीने केलेल्या कार्याची व लोककला टिकवून ठेवण्याच्या निर्धाराची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!