Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरनागपूर येथे धम्मदीक्षा सोहळा; सातशेच्या वर उपासकांनी बौद्ध धम्माची घेतली दीक्षा...

नागपूर येथे धम्मदीक्षा सोहळा; सातशेच्या वर उपासकांनी बौद्ध धम्माची घेतली दीक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दीक्षाभूमीवर काल गुरुवारपासून धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी ससाई यांनी विविध राज्यातून आलेल्या उपासक-उपासिकांना धम्मदीक्षा दिली.पहिल्याच दिवशी सातशेच्या वर उपासकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती.त्या दिवसाची आठवण म्हणून भदन्त ससाई दर वर्षी धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतात.१० ते १२ ऑक्टोंबर दम्यान सलग तीन दिवस दीक्षेचा कार्यक्रम चालणार आहे.धम्ममंचावर भदन्त ससाई यांच्यासह भन्ते नागसेन,भन्ते प्रज्ञाबोधी,भन्ते नागवंश,भन्ते महानागा, भन्ते धम्मप्रकाश,भन्ते धम्मविजय,भन्ते नागवंश एस., भन्ते भीमा बोधी,भन्ते अश्वजित,धम्मशीला उपस्थित होत्या.सकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात सायंकाळपर्यंत जवळपास सातशेच्या वर उपासक उपासिकांनी धम्मदीक्षा घेतली.ससाई यांच्यासह प्रज्ञाबोधी व इतरही भन्तेनी धम्मदीक्षा दिली. उपासकांनी त्रिशण व पंचशील ग्रहण केले.तसेच त्यांना २२ प्रतिक्षा दिल्या.दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एक दिवसापूर्वी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले जाते. आज,शुक्रवारी सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम आज दिवसभर सुरू होता. सायंकाळी बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम, तसेच अंगुलीमाल व आम्रपाली हे नाट्य सादर केले जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!