- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली येथे शालेय बाल क्रीडा संम्मेलन नुकतेच पार पडले असून या स्पर्धेत देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याने चमकदार कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोऊन शाळेचा मान उंचावला आहे.देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचा इयत्ता ९ व्या शिक्षण घेणारा राजवीर सिंग चावला या विद्यार्थ्याने १७ वर्षाखालील मुले ४०० मीटर हर्डल्स रन मध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे.या सोनेरी यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.बी.पी.पडवेकर, मुख्यध्यापक पंकज डी.मेश्राम, क्रीडाशिक्षक विजय मुळे तसेच सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्याचे कौतुक करून जिल्हास्तरावरील कामगिरी बद्दल कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- Advertisement -

