- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरात रेशनधान्याचा पुरवठा होतो.त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसी करण्याची अट घातली आहे.योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे.ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील धान्य
मिळविण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ चे बंधन भालण्यात आले आहे.अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत. मात्र,तरीदेखील अनेक शिधापत्रिकाधारकांली ‘ई-केवायसी’ ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.तत्पूर्वी, ‘ई-केवायसी’ करण्यासाठी ३१ ऑक्टोंबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोंबर पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही.याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिकादेखील रद्द केल्या जाणार आहेत.
- Advertisement -

