उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा गाजावाजा करीत वर्षाला एका कुटुंबीयांना ३ सिलेंडर मोफतची घोषणा केली होती.त्यानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक मोफत ३ गॅस सिलिंडरचा लाभ दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.यामध्ये गॅस जोडणी ही केवळ महिलांच्याच नावाने असेल तर लाभ मिळणार अन्यथा लाभ मिळणार नाही; असा निर्णय घेण्यात आला होता.मात्र,बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत.त्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा केली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत म्हणजे तीन गॅस सिलिंडर मोफत योजनेचा लाभ मिळेल,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मोफत ३ सिलेंडर मिळणाऱ्या कुटुंबीयांना मोठा दिलासा… – आता ‘या’ महिलांनाही मिळणार मोफत सिलेंडर…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

