Sunday, July 12, 2026
Homeदेसाईगंजसमाजवादी पक्षाचा स्थापना दिन साजरा.. - देसाईगंजच्या हेटी येथील मतिमंद विद्यालयात फळांचे...

समाजवादी पक्षाचा स्थापना दिन साजरा.. – देसाईगंजच्या हेटी येथील मतिमंद विद्यालयात फळांचे वाटप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-समाजवादी पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून देसाईगंज येथील पार्वती निवासी मतिमंद विद्यालय हेटी या ठिकाणी समाजवादी पक्षाच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.फळांचे वाटप कार्यक्रमास सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या डॉ.मेघा सावसाकडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.आज,४ ऑक्टोंबर रोजी समाजवादी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
समाजवादी पार्टी ही देशातील एक प्रमुख पार्टी असून समाजवादी पक्षाची स्थापना दिनांक- ४ ऑक्टोंबर १९९२ साली झाली.समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि संरक्षक स्व.मुलायमसिंह यादव हे होते. मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशचे तीन वेळा मुख्यमंत्री आणि देशाचे रक्षामंत्री राहिले आहेत.सध्या त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.महाराष्ट्रात सध्या अबू आसिम आझमी हे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून आमदार आहेत.महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात समाजवादी पक्ष सक्रिय असून विविध ठिकाणी जिल्हा परिषद, नगर पालिकेवर समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे.आज समाजवादी पक्षातर्फे घेण्यात आलेल्या फळ वाटप कार्यक्रमात गडचिरोली जिल्हाध्यक्ष इलियास खान,प्रमुख महासचिव महेबूब खान,जिल्हा पदाधिकारी फैझान पटेल,जिल्हा कोषाध्यक्ष जिब्राईल शेख,महिला सभा जिल्हाध्यक्ष सीमाताई डोंगरे, देसाईगंज तालुकाध्यक्ष डोमाजी दिवटे,हाजरा शेख, कल्पना ताई,सुनीता ताई,अस्लम शेख,जावेद खान, जब्बार शेख,देसाईगंज शहराध्यक्ष प्रमोद करंडे,मुन्ना शेख आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी शाळेतील मुख्यध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमास काँग्रेसच्या पदाधिकारी डॉ.मेघाताई सावसाकडे यांनी उपस्थिती राहून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!