Thursday, September 3, 2026
Homeनागपूरआता नागपुरात होणार महिलांसाठी राज्यातील पहिली एमआयडीसी...

आता नागपुरात होणार महिलांसाठी राज्यातील पहिली एमआयडीसी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान येथे महिलांसाठी राज्यातील पहिली एमआयडीसी उभारण्यात येणार आहे.दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील आणि अधिसूचना जारी होईल.यासोबतच हिंगणा,बुटीबोरीत आता जागा नसल्याने आमडी परिसरात नवी सुसज्ज एमआयडीसी उभारली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
नागपुरातील कार्यक्रमात उद्योजकांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचेही सादरीकरण झाले.यानंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले,आम्ही पुराव्यानिशी राज्यात किती परकीय गुंतवणूक आली,किती उद्योग सुरू झाले,किती रोजगारांची निर्मिती झाली,याची माहिती देत आहोत. लाडकी बहीण या योजनेतून ४६ हजार कोटी रुपये महिलांना मिळणार असून,शेवटी ही रक्कम गुंतवणूक, विविध वस्तू खरेदीसह बाजारातच येणार आहे.
राज्यातील सर्वच उद्योगांची उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे.यामुळेच यात या योजनेचा समावेश केला.कुठलेही राजकारण नाही; असेही सामंत म्हणाले.
उद्योगात महिलांचा सहभाग वाढावा,महिला उद्योजक तयार व्हावेत,महिलांना उद्योगात काम मिळावे, रोजगाराच्या संधी तयार व्हाव्यात,यासाठी महिलांसाठी एमआयडीसी उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.राज्यातील महिलांसाठीची ही पहिली एमआयडीसी असणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भातील निर्णय घेतील.दोन दिवसांत अधिसूचना जाहीर होईल; असे सामंत यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!