Saturday, June 27, 2026
Homeमुंबईट्रेन झाली लेट; प्रवाशी बसला ताटकळत... - ग्राहक मंचात घेतली धाव; रेल्वेला...

ट्रेन झाली लेट; प्रवाशी बसला ताटकळत… – ग्राहक मंचात घेतली धाव; रेल्वेला २० हजार रुपयांचा दंड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-रेल्वे २१ तास उशिरा आल्यामुळे ग्राहक मंचाने थेट रेल्वेलाच २० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. रेल्वे २१ तास उशिरा पोहोचली,म्हणून प्रवाशाने जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली.तेव्हा ग्राहक मंचाने रेल्वेला २० हजार रूपयांचा दंड ठोठावला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने मागील वर्षी वाशीमहून जम्मूला जाण्याचे नियोजन केले होते. यासाठी त्याने हमसफर ट्रेनची तिकिटे बुक केली  होती.जाण्याच्या तिकीटांसोबतच त्याने परतीच्या प्रवासाचे देखील नियोजन केले होते.परत येण्यासाठी रिटर्न तिकीट देखील बुक केलेले होते.
ही ट्रेन २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजता निघणार होती.त्यानंतर २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी जम्मूला पोहोचणार होती.परंतु वाशीमला ही ट्रेन सात तास उशिरा पोहोचली.त्यानंतर १४ तास उशिराने जम्मूला पोहोचली म्हणजेच ही ट्रेन २१ तास लेट झाली होती. त्यामुळे या व्यक्तीला वाशिम स्थानकावर सात तास वाट पहावी लागली.
जम्मू येथेही पोहोचण्यास देखील उशीर झाला. त्यामुळे या व्यक्तीची प्रवासाची योजना फसली,असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.नियोजनाप्रमाणे जम्मूमध्ये प्रवास करता आला नाही; अशी तक्रार त्याने ग्राहक मंचात केली. वाशिममधील जिल्हा आयोगाने या याचिकेवर विशेष निर्णय घेतला.कारण रेल्वेने जिल्हा आयोगाने नोटीसला प्रतिसाद दिला नव्हता.यामुळेच आदेशात जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने भारतीय रेल्वेला २१ तासांच्या उशीराची भरपाई म्हणून प्रवाशाला २० हजार रुपये देण्याचे निर्देश दिले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!