Tuesday, August 25, 2026
Homeदेसाईगंजमाहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ

माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास केली जाते टाळाटाळ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागितल्या जाणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील जनमाहिती अधिकारी मागितलेली माहिती देण्यास ३० दिवसांचा कालावधी लोटूनही माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.विहित मुदतीत माहिती दिली जात नसल्याने भ्रष्टाचाराला चालना मिळत असल्याचे चित्र हल्ली सर्वत्र दिसून येत आहे.

माहितीचा अधिकार कायदा १२ आक्टोंबर २००५ रोजी अंमलात आणला गेला. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रशासनातील दोष,उणिवा,गैर प्रकार उघड करण्यास मदत होते. माहितीचा अधिकार एकमेव असा कायदा आहे कि लोकप्रशासनाने पाळायचा असून त्यावर जनतेची नजर असते.कायद्यामुळे संपूर्ण भ्रट्टाचार संपणार नसून भ्रष्टाचाराचे काही प्रमाण कमी होणार आहे.कायद्यामुळे शासनाचा जनतेशी संबंध येतो.शासकीय तसेच खासगी कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकता यावी व सामान्य नागरिकांना कामकाजाची माहिती व्हावी व अधिकृत कागदपत्रे मिळाविता याच उद्देषाने माहितीचा अधिकार कायदा पारित करण्यात आला.मात्र सध्या स्थितीत जनमाहिती अधिकारी ३० दिवस होऊन सुद्धा माहिती देत नसल्याचे निदर्शनास येत आहे.एवढा कालावधी मिळूनही माहिती दिली जात नसल्याने भ्रष्टाचार कमी न होता वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शासन स्तरावरून कितीही कठोर कायदे तयार केली तरी काही भ्रष्ट अधिकारी,कर्मचाऱ्यांना याचे सुतक ना बारसा असे झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!