Thursday, October 8, 2026
Homeगडचिरोली किराणा दुकानाच्या आड सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री -प्रशासन गाढ झोपेत,विक्रेते मालामाल

 किराणा दुकानाच्या आड सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री -प्रशासन गाढ झोपेत,विक्रेते मालामाल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ व इतर ठिकानातील किराणा दुकानदार व्यावसायिक किराणा दुकानाच्या आड इतर सामानांसोबतच सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री करीत आहेत.कुणाला न जुमानता राजरोसपणे सुगंधित तंबाखूची विक्री केली जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग गाढ झोपेत असल्याचे दिसून येते.सुगंधित तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने सर्वसामान्य जनता तंबाखूच्या आहारी गेल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.

जिल्ह्यात मुख्य बाजारपेठेत व इतर ठिकाणी किराणा दुकाने मोठ्या संख्येने स्थायी स्वरूपात असल्याचे दिसून येतात.यातील किराणा दुकानदार हे पैस्याच्या हवास्यापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळून आपले हेतू साध्य करून तंबाखू विक्रीचा व्यवसाय चालवला आहे.काही किराणा दुकानदार दुकान तपासणी केली जात असल्याने गोडाऊन वा राहत्या घरी सुगंधित तंबाखूची साठवणूक करून ठेवत असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात तंबाखू विक्रीला बंदी असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असून याकडे कां बरं दुर्लक्ष केले जाते आहे.तंबाखूच्या आहारी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सेवन करण्याचे प्रमाण वाढल्याने घसा दुखणे,दंत कीड,पोट दुखी, पोटात गोळा तयार होणे व इतर असे अनेक आजार होण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढल्याचे दिसून येते.यामुळे तंबाखू विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील किराणा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अनियमितता भोवली; कुरखेडा तालुक्याच्या पुराडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामपंचायतीला प्राप्त होणाऱ्या विविध विकास कामांच्या निधीत तसेच अर्थसंकल्पीय तरतूदी शिवाय नियमबाह्य जादादर लावून खर्च करणे,खरेदी केलेल्या साहित्यांच्या नोंदी साठापंजीला न घेणे,विविध...

ज्या लोकप्रतिनिधींच्या हातात राजकारणाची दोरी; तेच पदवीधर मतदारसंघाच्या मतदानापासून राहणार दूर.. – १४ आमदार आणि दोन खासदार यांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.उद्या,शुक्रवार ९ ऑक्टोंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून २३ ऑक्टोंबर...

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि...

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!