गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील मुरदोली ते मुंडीपार दरम्यान पालेवाडा जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात युवक ठार झाल्याची घटना आज,शनिवार दिनांक-१४ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. बसंतराव खेतराम ढोरे वय ४५ वर्षे रा.कलपाथरी असे मृतक युवकाचे नाव आहे.बसंतराव हा काल,शुक्रवारी शेळ्यांसाठी झाडांच्या फांद्या आणण्यासाठी पालेवाडा जंगल परिसरात गेला होता.मात्र,रात्रीपर्यंत घरी परतला नाही.कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली असता त्याचा थांगपत्ता लागला नाही.दरम्यान,आज शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास काही गावकरी पालेवाडा जंगल परिसरात गेले असता त्यांना बसंतरावचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळावर प्रथमदर्शनी पाहता ही घटना १३ सप्टेंबर रोजीच घडली असावी,असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती गोरेगाव वन परिक्षेत्र कार्यालयाला देण्यात आली.माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

