Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीप्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारकरिता १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ...

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारकरिता १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारसाठी शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,खेळ, नाविण्यपूर्ण शोध; अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी करीत असलेल्या बालकांना बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कारसाठी वैयक्तीक पुरस्कार व संस्थास्तर पुरस्कार दिला जाणार आहे.
बाल शक्ती पुरस्कार करिता मुलांचे वय ५ ते १८ वयोगटातील असावे तसेच शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,खेळ,नाविण्यपूर्ण शोध,सामाजिक कार्य,शौर्य; अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
वैयक्तीक पुरस्कारकरीता मुलांच्या विकास,संरक्षण व कल्याण क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस पुरस्कार दिला जाणार आहे.तसेच संस्था स्तरावर बाल कल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला पुरस्कार दिला जाणार आहे.संस्था पूर्ण शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी व बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्ष सातत्यपूर्ण उत्कृक्षपणे कार्य करणारी असावी.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार सदर पुरस्कारांसाठी नामनिर्देशन करावयाच्या मार्गदर्शक सूचना सर्वसाधारणपणे खालील प्रमाणे विहित केलेल्या आहेत.
१) सार्वजनिकरित्या खुले नामनिर्देशन ही केवळ संकेतस्थळामार्फतच (www.awards.gov in) स्वीकारले जाईल.संकेतस्थळा व्यतिरिक्त प्राप्त होणारे नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
२) पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात पुरस्कार देण्याकरिता प्रत्येक वर्षाच्या ३१ आगस्ट पर्यंत वर्षभर केव्हाही संकेतस्थळामार्फत अर्ज स्वीकारले जातील. ३) विशेष नैपुण्य असणाऱ्या मुलाची शिफारस कोणताही नागरिक संकेतस्थळावर करेल.
४) संकेतस्थळामार्फत विहित मुदतीत प्राप्त होणारे अर्ज राज्य केंद्रशासित प्रदेश आणि जिल्हाधिकारी, जिल्हा न्यायाधीश इतर शासन योग्य संस्था यांना पडताळणी करता पाठविण्यात येतील.
५) वरील प्रकियानंतर अर्जाची छाननी त्याच्या पात्रतेनुसार करण्यात येईल.सन २०२५ साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी बालक व संस्थांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत www.awards.gov in  या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे; असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!