Wednesday, September 2, 2026
Homeगोंदियाघरकुलाचा शेवटचा हफ्ता बाकी; कंत्राटी अभियंत्याने केली लाचेची मागणी अन् अडकला जाळ्यात..-...

घरकुलाचा शेवटचा हफ्ता बाकी; कंत्राटी अभियंत्याने केली लाचेची मागणी अन् अडकला जाळ्यात..- आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव येथील पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंत्याला ७ हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने आज, गुरूवार दिनांक-१२ सप्टेंबरला रंगेहाथ अटक केली. अनिल धर्मराज मेश्राम असे लाचखोर कंत्राटी अभियंत्याचे नाव आहे.राज्य शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत २०२३-२४ या कालावधीत ग्रामपंचायत मोरगाव येथील लाभार्थ्याला घरकुल मंजूर होवून १ लाख ३१ हजार रुपये अनुदान मंजूर झाले.मंजूर झालेल्या घरकुलाची प्रशासकीय मंजुरी घेऊन लाभार्थ्यांनी बांधकाम केले.दरम्यान,लाभार्थ्याने शेवटच्या देयकाची मागणी केली.मात्र,कंत्राटी अभियंता धर्मराज मेश्राम याने देयकाच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या नावावर लाभार्थ्याकडून १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.मात्र,लाभार्थ्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली.त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज,गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात सापळा रचला व कंत्राटी अभियंत्याला तडजोडीअंती लाभार्थ्याकडून सात हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!