Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीअखेर धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात पडली फूट.. - भाग्यश्री आत्राम यांनी आज...

अखेर धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात पडली फूट.. – भाग्यश्री आत्राम यांनी आज शरद पवार गटात केला प्रवेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या घरात अखेर फूट पडली असून आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम(हलगेकर) यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज,१२ सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश केला.इतकेच नाही तर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात अजित पवार आणि वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्यावरही निशाणा साधला.
मी शांत आहे ते बरे आहे; नाहीतर माझ्याकडे दहा हात आहेत.मी शेरनी आहे.तुमच्याकडे दुधारी तलवार असल्याचे तुम्ही म्हणत असाल तर मी देखील दुर्गा आणि चंडीचा अवतार असल्याचा इशारा भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांचा दिला आहे. मला आक्रमक होण्याची संधी देऊ नका; आगामी काळात मैदानही आमचेच असेल आणि तिथे चौकार, षटकार देखील आम्हीच लगावणार असल्याचे भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.वडील धर्मरावबाबा आत्राम यांना देखील भाग्यश्री आत्राम यांनी चांगलेच सुनावले.वडिलांचा विरोध असताना देखील त्याला न जुमानता भाग्यश्री आत्राम यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटात प्रवेश करत असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या.मात्र, त्याला धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोध केला होता. मी घर फोडून बाहेर पडले नाही तर घर फोडून अजित पवार बाहेर पडले असल्याचे भाग्यश्री यांनी म्हटले आहे.आधी अजित पवार यांनी ते कबूल करावे; अशा शब्दात भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय हा माझा आहे.शरद पवारांनी आमचे घर फोडलेले नाही.मी पक्षप्रवेशासाठी तीन वेळा त्यांची भेट घेतली असल्याचे देखील भाग्यश्री आत्राम यांनी म्हटले आहे.
माझ्या वडिलांकडे दुधारी तलवार असेल आणि त्याचा वापर ते करणार असेल तर मला देखील दहा हात आहेत हे लक्षात ठेवा.आगामी काळात नवरात्र आहे. त्यामुळे आगामी काळात मला चंडी आणि दुर्गा होण्याची संधी देऊ नका; अशा शब्दात त्यांनी आत्राम यांना सुनावले आहे.मी जेवढी शांत आहे; तेवढी मला शांतच राहू द्या. असे देखील त्या म्हणाल्या. धर्मरावबाबा शेर असतील तर त्यांची मुलगी देखील शेरनी आहे.आणि शेरनी जास्त घातक असते; हे लक्षात ठेवा,असे देखील त्यांनी सुनावले. माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकी दिली,हात लावला तर ते हात तोडल्याशिवाय मी राहणार नाही; असा गंभीर इशारा देखील त्यांनी धर्मरावबाबा आत्राम यांना दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!