- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-नागपूर शहर पोलिस दलात झोन ४ च्या उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी पार्वतीनगरमध्ये धाड टाकून वरळी-मटक्याची खायवाडी करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई केली.या कारवाईत अजनी पोलिस ठाण्यातील एक शिपाईसुद्धा मटका लावताना आढळल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश संभाजी बावणे वय ४० वर्षे,रा.शंकरपूर बेलतरोडी,मनीष माताप्रसाद प्रजापती वय २६ वर्षे,रा. शेषनगर हुडकेश्वर अशी वरळी-मटक्याची खायवाडी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.तर, मनोहर काशीनाथ मुलमुले वय ४२ वर्षे असे लगवाडी करणाऱ्या अजनी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाचे नाव आहे.झोन ४ च्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी कल्याण मुंबई नावाचे सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे स्वीकारून खायवाडी करणाऱ्या आरोपी मंगेश आणि मनीष यांच्यावर कारवाई केली.आरोपी मंगेशजवळ आकडे लिहिलेल्या २५१ चिठ्ठया,४५० रुपये,मोबाइल आणि पेन आढळला.
आरोपी मनीषजवळून १७० रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आला.आरोपी मंगेशचा मोबाइल तपासला असता त्यात अजनी ठाण्यातील पोलिस शिपाई मनोहर मुलमुले याने लगवाडी केल्याचे दिसून आले.त्यामुळे तिन्ही आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार,उपनिरीक्षक सुशांत उपाध्ये,चेतन एडके यांनी केली.
- Advertisement -

