Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरसट्टापट्टीवर लगवाडी लावणाऱ्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल...

सट्टापट्टीवर लगवाडी लावणाऱ्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर शहर पोलिस दलात झोन ४ च्या उपायुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी पार्वतीनगरमध्ये धाड टाकून वरळी-मटक्याची खायवाडी करणाऱ्या दोन आरोपींवर कारवाई केली.या कारवाईत अजनी पोलिस ठाण्यातील एक शिपाईसुद्धा मटका लावताना आढळल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश संभाजी बावणे वय ४० वर्षे,रा.शंकरपूर बेलतरोडी,मनीष माताप्रसाद प्रजापती वय २६ वर्षे,रा. शेषनगर हुडकेश्वर अशी वरळी-मटक्याची खायवाडी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.तर, मनोहर काशीनाथ मुलमुले वय ४२ वर्षे असे लगवाडी करणाऱ्या अजनी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाचे नाव आहे.झोन ४ च्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी कल्याण मुंबई नावाचे सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे स्वीकारून खायवाडी करणाऱ्या आरोपी मंगेश आणि मनीष यांच्यावर कारवाई केली.आरोपी मंगेशजवळ आकडे लिहिलेल्या २५१ चिठ्ठया,४५० रुपये,मोबाइल आणि पेन आढळला.
आरोपी मनीषजवळून १७० रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आला.आरोपी मंगेशचा मोबाइल तपासला असता त्यात अजनी ठाण्यातील पोलिस शिपाई मनोहर मुलमुले याने लगवाडी केल्याचे दिसून आले.त्यामुळे तिन्ही आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले.ही कारवाई पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार,उपनिरीक्षक सुशांत उपाध्ये,चेतन एडके यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!