- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण धरणाच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना काल,मंगळवारी १० सप्टेंबरच्या सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.हेमराज रामदास सिखरामे वय ३३ वर्षे, रा.बोंडगाव सुरबन असे धरणात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. जिल्ह्यात सोमवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी,नाल्यांना पूर आला आहे.अशातच इटियाडोह धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या सांडव्यावरून ३.५ फूट पाणी वाहत आहे.हेमराज व त्याचा भाऊ अजय हे मंगळवारी सकाळी ११ वाजता इटियाडोह धरणाच्या सांडव्यावरील पाण्यात मासे पकडण्यासाठी गेले होते.मासे पकडतांना भिंतीवर उभे होते.दरम्यान,सांडव्याच्या भिंतीवरून हेमराजचा पाय घसरल्याने तो धरणाच्या पाण्यात पडला.पडताच त्याचा भाऊ अजय याने आरडा-ओरड केली. मात्र,पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने हेमराज पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
- Advertisement -

