Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोली'श्युअर टेक हॉस्पिटल नागपूर' ला महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे...

‘श्युअर टेक हॉस्पिटल नागपूर’ ला महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिली सदिच्छा भेट… – हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेमधून केला जातो मोफत ऑपरेशन व औषधोपचार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-काँग्रेसचे महाराष्ट्र ओबीसी प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी काल,१० सप्टेंबर रोजी नागपूरच्या जामठा येथील ‘श्युअर टेक हॉस्पिटल’ ला सदिच्छा भेट देत हॉस्पिटल मधील रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा तसेच स्टाफ बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असणारे ढोरे यांनी यापूर्वी आरोग्य शिबिरे आयोजित करून,आरोग्य शिबिरात पुढील उपचाराकरिता देसाईगंज तालुक्यातील व इतर परिसरातील जवळपास ११ रुग्णांना नागपूरच्या जामठा येथील ‘श्युअर टेक हॉस्पिटल’ येथे स्वखर्चाने भरती करून मोफत रुग्ण सेवेचा लाभ देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.मोफत आरोग्य शिबीरे, युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिबिरे,बेरोजगार मेळावे व इतर अशी अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रमे राबविण्यात ढोरे हे अष्टपैलू, क्रियाशील व्यक्तिमत्त्वाचे धनी आहेत.त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असून काल,१० सप्टेंबरला त्यांनी ‘श्युअर टेक हॉस्पिटल नागपूर’ ला भेट देऊन रुग्णांसाठी कश्या प्रकारे सोयी-सुविधा उपलब्ध आहेत; डॉक्टर तसेच स्टाफ रुग्णांची योग्यप्रकारे उपचार करून घेतात की नाहीत; या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेतली.माहिती जाणून घेतांना ‘श्युअर टेक हॉस्पिटल’ बद्दल ढोरे यांनी सांगितले की,हॉस्पिटलची सुसज्ज अशी इमारत असून रुग्णांकरीता सर्व सोयी-सुविधायुक्त असे ऑपरेशन रूम,विविध उपकरणे,मोफत औषधे,तज्ञ डॉक्टरांची टीम,आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्टाफ,स्वच्छ-सुंदर असे परिसर असून एखादा रुग्ण एकदा रुग्णालयात दाखल झाला की,अर्धे आजार आपोआपच बरे होऊन जातात.या हॉस्पिटलचे एक वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या शासकीय योजनेमधून हजारो रुपयांच्या वर मोफत औषधोपचार व ऑपरेशन केले जात असून,जास्तीत-जास्त रुग्णांनी रुग्ण सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्र ओबीसी प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केले आहे.
याप्रसंगी श्युअर टेक हॉस्पिटलचे फायनान्स डायरेक्टर अभिजीत देशमुख,हॉस्पिटल इन्चार्ज डॉ.उर्मिला ढाणके, डॉ.रामविलास मलानी व मोहन लोहंबरे उपस्थित होते.
रुग्णालयाचे लाभ घेण्याकरिता रुग्णांनी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा👇
 
१) महाराष्ट्र ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे -८७८८४८३५०६(8788483506)
२) सामाजिक कार्यकर्ते मोहन लोहंबरे – ८२०८९७४८१२(8208974812)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!