Monday, July 13, 2026
Homeनागपूरस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी तब्बल ३९ कर्मचारी केले निलंबित..

स्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी तब्बल ३९ कर्मचारी केले निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-स्वच्छता कार्यात हयगय करणाऱ्या कारवाईसाठी कामचुकारांवर नागपूर महानगरपालिकेने कठोर पवित्रा घेतला आहे.काल, मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या आकस्मिक पाहणीत विनापरवानगी गैरहजर आढळलेल्या ३९ सफाई कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
शहरातील विविध भागांत स्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत आयुक्तांनी सोमवारी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये भेट देऊन पाहणी केली होती.यावेळी त्यांनी कामात हलगर्जी करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत विभागाला निर्देश दिले होते.मंगळवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे पुन्हा आकस्मिक पाहणी करण्यात आली. यात एका वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षकासह तीन मलवाहक जमादार,एक प्रभारी जमादार व ३४ सफाई कामगार विनापरवानगी गैरहजर असल्याचे आढळून आले.सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ.गजेंद्र महल्ले यांच्यासह दहाही झोनच्या सहायक आयुक्तांद्वारे आकस्मिक पाहणी करण्यात आली.
निलंबित कर्मचाऱ्यांची नावे👇
वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक :- धर्मेश सिरसवान (लक्ष्मीनगर झोन),मलवाहक जमादार- राहुल रामटेके (नेहरूनगर झोन),स्वच्छता जमादार -अतुल सिरकीया (गांधीबाग झोन), स्वप्निल मोटघरे (सतरंजीपुरा झोन), प्रभारी स्वच्छता जमादार-ओमप्रकाश हाथीपछेल (गांधीबाग झोन).
 
स्थायी सफाई कामगार :-(लक्ष्मीनगर झोन) शरद गजभिये,संदीप जुगेल (धरमपेठ झोन) विशाल बाबुलाल गवळी,गवरी,गौरी,लखन नहेट,नेहा महातो (हनुमाननगर) सुरज महातो,प्रकाश,सोनू बक्सरे (धंतोली) मो.नवाज हनीफ जमाल,वतन महातो, कमल बछेले (नेहरूनगर),येल्लुमलाई शेट्टीया (गांधीबाग झोन),सुनीता जुगल,राज अमरसिंग करिहार,राज गौरे सतरंजीपुरा झोन),विनोद करिहार (लकंडगंज झोन),धम्मज्योती भिमटे, गौरी पसेरकर (आशीनगर झोन) कपिश शिव (मंगळवारी झोन) साजन बक्सरे इंद्रसेन वैद्य.
अधिसंख्य सफाई कामगार :- मनोज मरसकोल्हे, रंजिता महाजन,विनोद हुमणे,राधा हजारे,अरुण साखरे,सतीश शेवते, राजपाल लौंगबरसे,राजा बक्सरे,
सफाई कामगार :- विक्की राजेंद्र खरे, योगेश गौरे, उमेश नक्के, विनोद तांबे, रिषभ बक्सरिया.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!