Saturday, October 17, 2026
Homeनागपूरमागणी केली १० लाखांची अन् घेतले ८० हजार रुपये... - खंडणी प्रकरणी...

मागणी केली १० लाखांची अन् घेतले ८० हजार रुपये… – खंडणी प्रकरणी पत्रकारास अटक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विरोधातील बातमी प्रकाशित न करण्यासाठी खंडणी मागणारा दैनिक भास्करचा शहर संपादक सुनील हजारी वय ४४ वर्षे,रा.गणेशपेठ याला ८० हजार रुपये घेताना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली.हजारी याने एकूण दहा लाखांच्या रकमेची मागणी केली होती.सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने काल,गुरुवारी ही कारवाई केली.
आरटीओतील एजंट धनराज ऊर्फ टिटू शर्माने वय ५५ वर्षे रा.बाबादीपसिंहनगर यांनी प्रकरणात पोलिसांकडे धाव घेतली होती.शर्मा अनेक वर्षांपासून ग्रामीण आरटीओशी जुळला आहे.काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओमधील एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून,या प्रकरणात संबंधित शर्माची काय भूमिका आहे; याबाबत हजारीने वृत्त प्रकाशित केले होते.याच प्रकरणातील बातमी प्रसिद्ध न करण्याच्या बदल्यात आरोपीने संबंधित शर्माला दहा लाखांची मागणी केली होती.मात्र,त्यानंतर सात लाखांत डील झाली.दिनांक- २८ ऑगस्ट रोजी शर्माने त्याला रात्री साडेदहा वाजता मेडिकल चौकाजवळ एक लाखांचा पहिला हप्ता दिला होता.मात्र,त्यानंतर पैसे देण्याची इच्छा नसल्याने शर्माने सदर पोलिस ठाण्यात धाव घेतली.या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.उपायुक्त राहुल मदने यांच्या निर्देशांवरून सदर पोलिस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला.गुरुवारी आरोपी हजारी पुढील एक लाख घेण्यासाठी व्हीसीए  स्टेडियमजवळील आइस्क्रीम पार्लरमध्ये गेला.तेथे शर्माने हजारीला ८० हजार रुपये दिले.बाकीचे २० हजार कुठे गेले? असा सवाल त्याने विचारला असतानाच पोलिसांच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.हजारीने लगेच पैसे फेकले व ते माझे नाहीत असा आव आणला.मात्र,सीसीटीव्हीत पूर्ण प्रकार कैद झाला होता.रात्री नऊ वाजताच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०८ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपी हजारीला रात्री लॉकअपमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आरोपी मोठ्या वर्तमानपत्रात शहर संपादक असल्यामुळे या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.याअगोदरदेखील नागपुरातील काही पत्रकारांविरोधात गुन्हे किंवा पोलिस तक्रारी झाल्या आहेत.मात्र,मोठ्या पदावरील पत्रकार रंगेहाथ सापडल्याची ही पहिलीच घटना म्हणावी लागेल.यानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत काही मोठ्या व्यक्त्तींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!