Thursday, July 30, 2026
Homeगडचिरोलीसंशयितरित्या फिरतांना आढळून आला इसम... - चौकशीअंती निघाला कट्टर नक्षल समर्थक...

संशयितरित्या फिरतांना आढळून आला इसम… – चौकशीअंती निघाला कट्टर नक्षल समर्थक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील एका निरपराध व्यक्तीचा खून करणाऱ्या नक्षलवाद्याला काल, २० ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली आहे.प्रमोद मधुकर कोडापे वय ३७ वर्षे रा.भंगारामपेठा,ता.अहेरी असे अटकेत असणाऱ्या नक्षल्याचे नाव आहे.दामरंचा उपपोलिस ठाणे आणि केंद्रीय राखीव दलाच्या बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना प्रमोद कोडापे यास संशयितरित्या फिरत असतांना अटक केली.
चौकशीअंती तो कट्टर नक्षल समर्थक असल्याचे निष्पन्न झाले.शिवाय २४ नोव्हेंबर २०२३ रोजी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम नामक व्यक्तीच्या खुनात त्याचा सहभाग होता.२०१७ पासून नक्षल्यांच्या जनमिलिशियाचा तो सदस्य म्हणून कार्यरत होता.राज्य शासनाने त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!