Tuesday, August 25, 2026
Homeकुरखेडा कुरखेडा व देसाईगंज तालुक्यातील रेती तस्करांकडून वसुली करणारे 'ते' कोण?- वसुलीकर्त्यांमुळे रेती...

 कुरखेडा व देसाईगंज तालुक्यातील रेती तस्करांकडून वसुली करणारे ‘ते’ कोण?- वसुलीकर्त्यांमुळे रेती चोरीचे वाढले प्रमाण, प्रशासनाचे दुर्लक्ष

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :-गेली दोन वर्षांपासून रेती घाटांचे लिलाव झाले नसतांना रेती तस्करीला उधाण येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे रेती तस्करांकडून २५ हजार ते ३० हजार रुपये महिना ठरवून ‘माल सुतावो’अशी सर्वच स्तरावरून विभागणी करून ‘तुम भी खुश,हम भी खुश’अशी वसुली करणारे उदयास आले असल्याने शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडून रेती तस्कर रेतीचा सोक्ष-मोक्ष करून चढ्या दराने विक्री करतांना दिसून येत आहेत. 

रेती चोरीचे रात्रभर चालणारे वाहन सध्याच्या घडीला दिवसागणिक मुख्य मार्गावरून व छुप्या मार्गाने बिनधास्तपणे नेतांना दिसून येत आहेत.रेती घाटांचे लिलाव न होता अवैधरित्या रेती वापरून सिमेंट रस्ते बांधकाम,नाली बांधकाम,खाजगी इमारत बांधकाम,शाळा बांधकाम व इतर शासकीय बांधकामे कशी काय?पूर्ण केली जात आहेत.असा प्रश्न निर्माण झाला आहे.हल्ली देसाईगंज शहर,कुरखेडा शहर व इतर ठिकाणी अवैधरित्या रेतीचा वापर भरपूर प्रमाणात दिसून येत असतांनाही याकडे कानाडोळा कां-बरं केल्या जात आहे?

अवैधरित्या रेती तस्करी करणारे एका रात्रीच्या सुमारास सात ते आठ ट्रॅक्टर रेती घाटामध्ये जाऊन ४० ते ५० ब्रास रेती एका रात्रीतून चोरी करीत असल्याची खमंग चर्चा जनसामान्यांमध्ये सुरू आहे.’रात्रीचा मामला व हळूहळू बोंबला’अशी सर्वच ठिकाणची अवस्था झाली आहे.रेती तस्कर अंतरानुसार रेतीचे दर ठरवून २ किमी अंतरासाठी ३ हजार रुपये तर ८ किमी अंतरासाठी ५ हजार रुपये व जास्तीचे अंतरासाठी अवाढव्य दर लावून ‘माल सुतावो’करीत आहेत.

कित्येकदा रेती तस्करांकडून ‘आमचे धागेदोरे लंबे आहेत’आम्हला कोण पकडू शकतो’अशी धमकीवजा बोलणी ऐकावयास मिळते आहे.धमकीवजा बोलणी करण्यामागे ‘वसुलीकर्त्यांचा आशिर्वाद’रेती तस्करांवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असल्याने अशा वसुलीकर्त्यांवर प्रशासनाने जातीने लक्ष घालून वसुली कर्त्यांबरोबरच रेती तस्करांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक असल्याचे जनसामान्यांतुन सूर निघू लागले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!