उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा(देसाईगंज):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे ६ ऑगस्ट रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया,गडचिरोली स्मार्ट कक्ष,आत्मा व देसाईगंज फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोंढाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील दत्त मंदिर परिसर तसेच इतर ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी गावातील मुख्य दत्तमंदिर परिसरातील आवारात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फळझाडे लावण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांना फळझाडांचे वाटप करण्यात आले.प्रसंगी रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या वतीने आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांची प्रमुख उपस्थिती होती.गजबे यांनी ‘एक पेड मॉ के नाम’ याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रज्ञा गोडघाटे विभागीय नोडल अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर, बसवराज मास्तोळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, अर्चना कोचरे नोडल अधिकारी स्मार्ट कक्ष गडचिरोली,उपविभागीय कृषी अधिकारी परांजपे, सर्वेश आरबीआय नागपूर,सौरभ आरबीआय नागपूर, खंडाळे तालुका कृषी अधिकारी वडसा,बलराम बलगमवार मूल्य साखळी विकास तज्ञ नागपूर,गौरव डेहनकर पर्यावरण तज्ञ नागपूर,भूषण देशमुख कृषी पर्यवेक्षक वडसा,विनोद राहंगले आत्मा वडसा तसेच देसाईगंज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सुनील पारधी,संचालक मेघनाथ दुनेदार,चेतनदास विधाते, कैलास पारधी,विकास पारधी,प्रमोद बेदरे,अनिता शेंडे, लता बघमारे,सरिता आत्राम तथा संपूर्ण संचालक मंडळ,कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद व गावकरी उपस्थित होते.

