Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीउद्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आस्थापनांसाठी कार्यशाळेचे आयोजन…

उद्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आस्थापनांसाठी कार्यशाळेचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयंम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी उद्या २ ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व शासकीय कार्यालय,महामंडळ,सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख,गोंडवाना विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी या योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयात व औद्योगिक आस्थापनेत रुजू झालेल्या  प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!