Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीअखेर वन परिक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित..-बोगस मजूर तसेच इतर अपहार प्रकरण..

अखेर वन परिक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित..-बोगस मजूर तसेच इतर अपहार प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-शासनस्तरावरून नोकरदार वर्गांना जनतेची वा शासनाची कामे करण्यासंबंधाने सातव्या वेतन आयोगानुसार महिन्याकाठी मोठा पगार(वेतन) दिला जातो.तरीही काही जणांना अपुरेच असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कामांत गैरप्रकार केल्या प्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करण्यात आले आहे.

गडचिरोली वनवृत्तातील गडचिरोली वनविभागा अंतर्गत धानोरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्राचा समावेश होतो.मार्च २०२१ ते २०२४ पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड,हेक्टरी मोजमाप,हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे,प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी पडवे यांच्याबाबत शासनाकडे तक्रार केली होती.प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे,मोजमाप पुस्तिका,प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास या घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री,वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.याशिवाय साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची मागणी केली होती.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक,वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची चर्चा होती. याशिवाय चातगाव वनपरिक्षेत्रात अतिक्रमण,अवैध उत्खनन,वृक्षतोडही झाल्याचा संशय होता.दरम्यान आरएफओने वनपालामार्फत आपल्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी,अशीही मागणीही खरवडे यांनी केली होती.दरम्यान मुख्य वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली.चौकशी अंती वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी.पडवे हे दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!