Tuesday, July 14, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहिलांसाठी बिनव्याजी लखपती दीदी कर्ज योजना…

महिलांसाठी बिनव्याजी लखपती दीदी कर्ज योजना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असते.विविध योजनांमुळे लोकांना आर्थिक मदत मिळते.केंद्र सरकारच्या महिलांसाठी काही विशेष योजना आहेत.या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते.या योजनेच नाव लखपती दीदी असे आहे.महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे.

मोदी सरकारने १५ ऑगस्ट २०२३ रोजी ही योजना सुरु केली होती.या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.या प्रशिक्षणासोबतच आर्थिक मदतदेखील केली जाते.या योजनेत महिलांना १ ते ५ लाख रुपये कर्ज दिले जाते. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज लागत नाही. या योजनेअंतर्गत महिलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात.तसेच व्यवसाय कसा करायचा याबाबत टीप्सदेखील दिल्या जातात.

या योजनेत महिलांना आर्थिक टीप्स,बिझनेस मार्केटिंग प्लान याबाबत माहिती दिली जाते. याचसोबत ऑनलाइन बँकिंगबाबत माहिती दिली जाते.आतापर्यंत जवळपास ९ कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेमुळे बचत गटाशी संबंधित महिलांना फायदा होत आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या योजनेमुळे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.या योजनेसाठी महिलांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.१८ ते ५० वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.या योजनेत अर्ज करणाऱ्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात भेट द्यावी लागेल.त्यानंतर योजनेचा फॉर्म अधिकाऱ्याकडून घ्यावा लागेल.या फॉर्ममध्ये तुम्ही सर्व माहिती भरा.आवश्यक कागदपत्रे जमा करा.त्यानंतर अर्जदाराला पावती दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे आधारकार्ड,वय प्रमाणपत्र,पासपोर्ट साइज फोटो,पॅन कार्ड,बँक खाते असणे गरजेचे आहे.या योजनेत महिलांना आर्थिक साक्षरता वर्कशॉप,सेव्हिंग इन्सेंटिव्ह,मायक्रोक्रेडिट सुविधा,स्किल डेव्लपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग,व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!