Tuesday, September 22, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या.. -काँग्रेस नेते...

देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या.. -काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात सतत चार दिवस संततधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित होऊन काहींची घरे पडली तर काहींच्या घरात पाणी शिरून संपूर्ण घर जलमय झाल्याने लोकं चिंतातुर झाले आहेत.अशातच जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून शेतात पऱ्हे टाकले.पऱ्हे टाकून धान रोवणी केली.मात्र,धान रोवणी होताच पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे.शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्यामुळे महसूल प्रशासन विभागाने पडझड झालेल्या घरांची तसेच शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी नेते तथा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यासह इतरही तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रामदास मसराम व मित्र परिवार यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची दिनांक-२२ जुलै व २३ जुलै रोजी संपूर्ण तालुक्याच्या गावातील शेतकऱ्यांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली.पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व महसूल प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ 

 शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुरामुळे शेतातील धानपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे पंचनामे करून याद्याही तयार करण्यात आल्या.मात्र,तालुक्यातील  नुकसानीची १ कोटींच्यावर शेतकऱ्यांची रक्कम अजूनही मिळाली नाही.त्यामुळे मागील वर्षी व यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे; अशांना सरसकट त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी रामदास मसराम व मित्र परिवार यांनी केली आहे.

नुकसानीची पाहणी करतांना शेतकरी तथा काँग्रेस नेते रामदास मसराम,माजी देसाईगंज पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी देसाईगंज पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सागर वाढई हितेश तुपट,जावेद शेख,स्वप्नील मिसार,गौरव शिलार व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!