Tuesday, September 29, 2026
Homeगोंदियाधानाची भाववाढ होताच 'व्यापारी मालामाल तर शेतकरी कंगाल'…!

धानाची भाववाढ होताच ‘व्यापारी मालामाल तर शेतकरी कंगाल’…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :-सध्या धानाचे भाव वाढले आहेत.११ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत श्रीराम तीन हजार ते तीन हजार १०० रुपये तसेच मोहरा तीन हजार ४०० ते तीन हजार ५०० रुपये या भावात विकला गेला.

गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. याच धान पिकावर या जिल्ह्याची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे.जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टरवर खरिपाची पेरणी होते.यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच धान पिकास योग्य वातावरण नव्हते. तरी विविध साधनांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी धानाचे पीक लावायला सुरुवात केली.मागील वर्षी उतारी दर एकरी १५ ते २० क्विंटल होते.धान हातात आल्यानंतर हंगामावर झालेल्या खर्चाची परतफेड करण्यासाठी तसेच कौटुंबिक खर्चासाठी शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली.विक्रीची ही प्रक्रिया साधारणतः मार्च महिन्यापर्यंत चालते.अपवादात्मक स्थितीत काही सधन शेतकरी असतील त्याच शेतकऱ्यांकडे आता धान शिल्लक असतील; पण बहुतांश शेतकऱ्यांकडे आता धान शिल्लक नाहीत,ही वस्तुस्थिती आहे. गोंदिया गंजात ११ जुलै रोजी श्रीराम तीन हजार ते तीन हजार १०० रुपये तर मोहरा तीन हजार ४०० ते तीन हजार ५०० रुपये या भावात विकला गेला असल्याची माहिती आहे.

धान विक्रीचा हंगाम हा साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी,फेब्रुवारी व मार्च महि- न्यापर्यंत चालतो.या कालावधीतच बहुतांश शेतकरी धानाची विक्री करतात.शेतकऱ्यांनी विकलेले हे धान मिल मालक आणि व्यापारी खरेदी करतात.

व्यापारी धान साठवणूक करून ठेवतात आणि नंतर दर वाढले की,साठवणूक केलेले धान विक्रीसाठी काढतात.धानाचे भाव वाढले तर वाढलेल्या या भावाचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही.तो फायदा व्यापाऱ्यांनाच होतो.यातून ते मालामाल होतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू; मिरवणूक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी पूर्वपरवानगी आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महापुरुषांचे पुतळे विनापरवानगी बसविणे किंवा त्यांचे अनावरण करणे तसेच इतर बाबींवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!