Sunday, July 12, 2026
Homeनागपूरपर पुरुषाशी प्रेमसंबंधावरून पतीने संपविले पत्नीला…

पर पुरुषाशी प्रेमसंबंधावरून पतीने संपविले पत्नीला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे पतीने पत्नीवर सळाखीने वार करून तिला संपविल्याची घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दि. २५ च्या रात्री ८:३५ ते ९:१० वाजताच्या सुमारास घडली.यामुळे आरोपी आणि मृत महिलेचा दोन वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे.

मन्नत ऊर्फ मिनू दिलप्रीत कौर विर्क वय २४ वर्षे,असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे,तर दिलप्रीत ऊर्फ विक्की कुलविंदरसिंग विर्क वय ३० वर्षे,रा.पंचमवेद्य आर्य सोसायटी, दीक्षितनगरजवळ, कपिलनगर असे आरोपी पतीचे नाव आहे.दोघांचाही २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला असून,त्यांना एक २ वर्षांचा मुलगाही आहे.आरोपी दिलप्रीतचे चारचाकी वाहनांच्या ॲसेसरीज व स्पेअर पार्टचे दुकान आहे.मन्नतचे एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.काही दिवसांपूर्वी दिलप्रीतला सदर परिसरात मन्नत एका युवकासोबत फिरताना आढळली.त्यामुळे त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरजानी वय २० वर्षे,रा.हुडको कॉलनी,जरीपटका याला फोन करून मन्नतसोबत घटस्फोट घ्यायचा असून,त्याबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले.त्यानंतर आरोपी दिलप्रीतचा मन्नतसोबत मंगळवारी रात्री तिच्या प्रेमसंबंधावरून पुन्हा वाद झाला.रागाच्या भरात दिलप्रितने लोखंडी सळईने मन्नतच्या डोक्यावर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले.त्यानंतर आरोपी दिलप्रीत घराला कुलूप लावून निघून गेला.इकडे मन्नतचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणीने मन्नतशी संपर्क साधला असता,तिने प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे त्यांना शंका आली.त्यांनी पोलिसांसोबत जाऊन मन्नतच्या घराचे दार तोडून आत बघितले असता,ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता,डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मन्नतचा भाऊ विशालने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी दिलप्रीतविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!