Saturday, June 13, 2026
Homeदेसाईगंजयेत्या २२ जून ला सावंगी येथे भव्य आरोग्य तपासणी तथा रक्तदान शिबिराचे...

येत्या २२ जून ला सावंगी येथे भव्य आरोग्य तपासणी तथा रक्तदान शिबिराचे आयोजन…-काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांच्यातर्फे लाभ घेण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या ५ जुन रोजी झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार यांच्यातर्फे “भव्य आरोग्य तपासणी,मोफत औषध वाटप,भव्य रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी तथा मोफत चष्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदास मसराम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

‘तुमचे आरोग्य संवर्धन हेच आमचे धोरण’ या उदाक्त हेतूने येत्या शनिवार,दिनांक-२२ जुन २०२४ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंगी येथे सकाळी ११ वाजे पासून ते ३ वाजे पर्यंत सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

सदर आरोग्य शिबिरात शुअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,जामठा नागपूर तथा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली यांच्या तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.या शिबिरात हृदयरोग तपासणी,हाडांची तपासणी,सामान्य रोगांची तपासणी, नेत्र तपासणी,मोफत चष्मे वाटप,मोफत औषध वाटप, मधुमेह तपासणी,ई.सी.जी व इतर तपासणी व वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मसराम यांनी पत्रपरिषदेत दिली.

सदर शिबिराचे अधिक माहिती करीता सागर वाढई, जावेद शेख,राजु कुरेशी,दुशांत वाटगुरे,धर्मराज घोरमोडे,लंकेश ढोरे आदींशी संपर्क साधावे असेही मसराम म्हणाले.पत्रपरिषदेला माजी पं.स.सभापती परसराम टिकले,माजी उपसभापती नितिन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सागर वाढई,मोरू मोहुर्ले,राजुभाऊ रासेकर,जावेद शेख,राजु कुरेशी,सावंगीचे माजी सरपंच राजेंद्र बुल्ले,उपसपंच सुमन मेश्राम,कोंढाळाचे प्रमोद पत्रे, हितेश तुपट,नवधेष डोंगरे,बाबुराव राऊत आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!