Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीउद्याला चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार…-गडचिरोली-चंद्रपूर वैनगंगा नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी..

उद्याला चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार…-गडचिरोली-चंद्रपूर वैनगंगा नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात असलेल्या चिचडोह बॅरेजमधून उद्या दिनांक- २० जून रोजी सकाळी ८ वाजता प्रकल्पाचे सर्व ३८ दरवाजातून १९०.२३ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे.त्यामुळे नदीकाठावरील राहणाऱ्या गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानता बाळगावी; असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

गोसीखुर्द धरणातून ४० घ. मी./सेकंद इतका विसर्ग सोडण्यात आला असल्याने दिनांक- २९ जून २०२४ पर्यंत चिचडोह प्रकल्पाचा पाणीसाठा १७९.८०० मी. पर्यंत वाढेल,त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी चिचडोह प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ कि.मी.अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे.सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीचे वरचे बाजुस ४ किलोमिटर अंतरावर आहे.याची एकूण लांबी ६९१ मीटर असून त्यावर १५ मीटर लांबीचे व ९ मीटर उंचीचे ३८ लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आलेले आहेत.चिचडोह बॅरेजमध्ये दिनांक- १८ जून २०२४ रोजी पाणी पातळी १७८.९० मी.व पाणीसाठा ११.२८५ द.ल.घ.मी. इतका आहे. 

 या गावांनी धोका 👇

गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव,घारगाव,फराडा, वाघोली,चामोर्शी,हल्दीपूरानी,टेकडा,दोटकूली, कळमगाव,खंडाळा,एकोडी,अनकोडा,इल्लूर,नविन लोंढोली,आष्टी,चपराळा,गणपूर व कढोली तसेच चंद्रपुर जिल्ह्यातील लोंढोली,उसेगाव,पार्डी,बेंबाळ, जिबगाव,पेठगाव,शिर्सी, साखरा, कोरंबी,बोरघाट, देवाळा (बु),चखठाणा,विठ्ठलवाडा,पिपरी व घाटकूळ.वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदीलगतचे सर्व गावकऱ्यांनी सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करतांना उचित सतर्कता बाळगावी.मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरी, नदीवर आंघोळ करणारे,मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक,नदीतून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल मोरघडे यांनी केले आहे.  

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!