Friday, May 1, 2026
Homeगोंदियाप्रॉपर्टी डीलरचा खून करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ…

प्रॉपर्टी डीलरचा खून करणाऱ्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- जमिनीच्या आर्थिक देवाण-घेवाणीतूनच प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या महेश विजयकुमार दखने वय ३६ वर्षे,रा.छोटा गोंदिया यांच्यावर घातक शस्त्रांनी हल्ला करून ९ जून रोजी खून करणाऱ्या चारही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.१८ जूनपर्यंत आणखी त्यांचा मुक्काम  वाढला आहे.घटनाक्रम जाणून घेण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी न्यायालयाला पोलिस कोठडी वाढविण्याची विनंती न केली.न्यायालयाने त्या चारही आरोपींची पोलिस कोठडी वाढविली आहे.

अटक झाल्यानंतर आरोपी देवेंद्र ऊर्फ देवा तुकाराम कापसे वय ४८ वर्षे,रा.शिवमंदिर,आंबाटोली,फुलचूर गोंदिया,सुरेंद्र हरिदास मटाले वय ३२ वर्षे,रा.शिवणी / इंदिरानगर,चिरचाळबांध,ता.आमगाव, मोरेश्वर चैतराम मटाले २६ वर्षे,रा.मोहगाव,सुपलीपार, ता.आमगाव व नरेश नारायण तरोणे ३८ वर्षे,रा.आर.टी.ओ. ऑफिसजवळ,गोंदिया या आरोपींना न्यायालयाने १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.शनिवारी त्या आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!