Monday, August 31, 2026
Homeगोंदियावाघाच्या हल्ल्यात दोन गायी ठार तर एक बैल जखमी..

वाघाच्या हल्ल्यात दोन गायी ठार तर एक बैल जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटखेडा जवळील संभाजीनगर येथे काल,शनिवारी दि.१५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाघाने दोन गाई ठार केल्या,तर एका बैलाला गंभीर जखमी केले.सदर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटखेडा संभाजीनगर हा जंगलव्याप्त परिसर आहे.याठिकाणीजंगली हिंस्र पशू व वाघांसह बिबट्यांचा नेहमीच वावर असतो. परिसरात नेहमीच वाघ व बिबट्यांचे अनेकदा नागरिकांना दर्शन झाले आहे.आजपर्यंत अनेक पाळीव जनावरांची हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याची माहिती आहे.

अशीच घटना काल,शनिवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान संभाजीनगर/इटखेडा येथे घडली.यामध्ये वाघाने शंकर भागडकर यांच्या दोन गाई ठार केल्या, तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र फदे तथा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा केला.नुकसानग्रस्त शंकर भागडकर यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी व वारंवार होणाऱ्या  घटनांचा व हिंस्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी इटखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!