Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजपाहुण्यांसोबत जेवण करायला गेले अन् चोरट्यांनी १९ लाख रुपये चोरून नेले…!-देसाईगंज शहराच्या...

पाहुण्यांसोबत जेवण करायला गेले अन् चोरट्यांनी १९ लाख रुपये चोरून नेले…!-देसाईगंज शहराच्या गांधी वार्डातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ गणल्या जाणाऱ्या देसाईगंज शहरातील स्थानिक गांधी वॉर्डातील रहिवासी हरिजितसिंग सलुजा यांच्या घरी मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १९ लाख रुपयांवर डल्ला मारत पोबारा केला.

हरिजितसिंग सलुजा यांची दुचाकीची शोरूम आहे. त्यांच्या घरी मंगळवारी पाहुणे आले होते. पाहुण्यांसोबत जेवण करण्यासाठी सलुजा कुटुंबासह हॉटेलमध्ये गेले होते.

दरम्यान,चोरट्यांनी घरात प्रवेश केला.घरातील रोख रकमेसह सोने असा एकूण १९ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.जेवण करून आल्यानंतर घरात चोरी झाली असल्याचे सलुजा यांच्या लक्षात आले.त्यांनी याबाबतची तक्रार देसाईगंज पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!