Wednesday, July 22, 2026
Homeदेसाईगंजफरी-झरी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना…

फरी-झरी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देत आपल्या ज्ञान वाणीतून प्रज्ञा,शिल व करुणा याची शिकवण दिली.प्रत्येकांनी गौतम बुद्ध यांचा मार्ग अंगिकारला पाहिजे; ज्ञानार्जन सोबतच बुद्ध वाणी तितकीच श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केले ते देसाईगंज तालुक्यातील मौजा फरी-झरी येथे पंचशील बौद्ध समाजाच्या वतीने तथागत गौतम बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना व त्रिरत्न बुद्ध विहार लोकार्पण सोहळा कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.युवराज मेश्राम यांनी सांगितले की,तथागत भगवान बुद्ध यांच्या विचारातून जग हा मांगल्य हो; या भावाने बंधू भावानाने जगाचा प्रचंड ज्ञानी असलेल्या माणसात ज्ञानाचा विद्वान धम्म म्हणजे संस्कारांचा केंद्र होय;असे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी येथील सामाजिक विचारवंत डॉ.युवराज मेश्राम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र संघटक विजय बन्सोड विशेष अतिथी म्हणून काँग्रेस नेते रामदास मसराम,माजी सभापती परसराम टिकले,प्रकाश सांगोळे,हंसराज लांडगे, इंजिनिअर नरेश मेश्राम, रमेश रंगारी, गोपाल निमजे,प्रभु जनबंधु, उपसरपंच रमेश वाढई, दिनेश मोहुर्ले, लोकमान्य बरडे,विलास लोखंडे, गोपाल बोरकर,लक्ष्मण रामटेके,पो.पा.दिलीप मोहुर्ले, पत्रकार प्रविण राहटे,आंनद बन्सोड, चंद्रशेखर लांडगे, आनंदराव नंदेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विजय बन्सोड,रामदास मसराम,परसराम टिकले हंसराज लांडगे आदिनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन सुकेशिनी उके, प्रास्ताविक सिध्दार्थ खोब्रागडे,तर आभार अमित रामटेके यांनी मानले यावेळी फरी झरी येथील परिसरातील बौद्ध समाज व नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

देसाईगंजच्या शंकरपुर परिसरात सर्वात जास्त पावसाची नोंद; तर २० महसुल मंडळात मुसळधार पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात काल मंगळवारपासून ते आज बुधवार सकाळपर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली.अजूनही पाऊस सुरूच आहे.२४ तासात जिल्ह्यात सरासरी ५१.४ मिमी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!