Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीअंगावर विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू..-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घटना..

अंगावर विज कोसळल्याने दोघांचा मृत्यू..-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ,सोसाट्याचा वारा (ताशी ४०-५० किमी पर्यंत) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दिनांक-६ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती.त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ,वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.अशातच आज सायंकाळच्या सुमारास चामोर्शी तालुक्यात पावसा बरोबरच विजांचे कडकडाट होऊ लागले.अशातच चामोर्शी तालुक्यातील गोवर्धन गावातील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या घटनेत शंकरपूर (हेटी) गावातील वैभव चौधरी यांच्यावरही वीज कोसळली.वीज कोसळल्या नंतर रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.तर तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज कोसळल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!