उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज शहरातील तुकुम वॉर्डात उद्या,गुरुवार दिनांक-६ जून ला सूर्य पुत्र भगवान शनिदेवाची जयंती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.जयंती निमित्ताने शहरातील तुकुम वार्ड स्थित शनी देवाच्या मंदिराची आजपासूनच सजावट करण्यात आली आहे.उद्याला सकाळच्या सुमारास भगवान शनिदेवाची पूजा-अर्चना व आरती करण्यात येणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.भगवान शनिदेवाची जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक-भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राकेश रेखडे यांनी केले आहे.

