Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपत्नी,पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकत नाही…

पत्नी,पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकत नाही…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- पती-पत्नीचे हक्क नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिले आहेत. विशेषतः नवरा-बायको एकमेकांपासून विभक्त होतात तेव्हा अनेक समस्या उद्भवतात.अशा परिस्थितीत, दोघे न्यायालयात वेगवेगळे दावे करून स्वतःला कायदेशीररित्या योग्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.असाच काहीसा वाद मालमत्तेच्या बाबतीतही होतो ज्यामध्ये वेगवेगळे दावे केले जातात.अशा स्थितीत,पत्नीला पतीच्या परवानगीशिवाय मालमत्ता विकण्याचा हक्क आहे का? म्हणजे पत्नीला मालमत्ता विकण्यासाठी पतीची परवानगी घ्यावी लागेल का? असाही सवाल उपस्थित होतो.

पत्नी परवानगीशिवाय आपली मालमत्ता विकू शकते की नाही… अशी चर्चा अनेकदा सोशल मीडिया किंवा आपापसात लोकांमध्ये होते.या प्रकरणात गेल्या वर्षी कोलकाता उच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आणि म्हटले की,पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता असल्यास तिला प्रॉपर्टी/संपत्ती किंवा मालमत्ता कोणाशीही सल्लामसलत न करता विकण्याचा अधिकार आहे.तर पतीही पत्नीच्या परवानगीशिवाय आपली मालमत्ता विकू शकतो.

दुसरीकडे,मालमत्तेच्या अधिकारांबद्दल बोलायचे तर पतीने घेतलेल्या संपत्तीवर पत्नीचा पूर्ण अधिकार असून पती आपल्या पत्नीला मालमत्तेतून बेदखल करू शकत नाही.त्याचवेळी,पतीचे आई-वडील जिवंत असेपर्यंत पत्नी पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकत नाही म्हणजे,पतीने मिळवलेल्या संपत्तीवरच पत्नीचा हक्क असू शकतो.याशिवाय पतीपासून पत्नी वेगळी राहत असेल तर तिला खर्च म्हणून पतीला पैसे द्यावे लागतात.परंतु पती बेरोजगार असले आणि पत्नी नोकरी करत असेल तर पती देखील देखभाल खर्चाची मागणी करू शकतो आणि पत्नीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!